Wednesday, 22 November 2017

Every Thing happens for a good reason

सकाळी सकाळी मयंकला "हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण!" ह्याचा अर्थ सांगताना खूप सहज बोलून गेले की 'देता आले पाहिजे'. देण्यातच खरा आनंद आहेमयंकला ते कळले का नाही हा प्रश्न मला खूप उशिरा पडला पण त्याआधी, 'मी तशी आहे का?' असं वाटलं.. 
कुणी मला काय दिलय, म्हणून मी कुणाला काही द्यावंअसं वाटणाऱ्यांनी देण्याच्या नादीच लागू नयेकारण ते फक्त मत्सर आणि इर्षा देतील
"देणंम्हणजे प्रत्येकच वेळेला कोणतंही अर्थसहाय्य असलं पाहिजे असं नाही
देण्यात प्रेमआशाआनंदमैत्री याही गोष्टी येतातकदाचित मला देण्याच्या त्या स्थितीत यायला अवकाश असेन, पण देण्यातल्या त्या आनंदाला मला मुकायच नाही
हा विचार डोक्यात चालू असतानाच मी Signal ला येऊन थांबले आणि शेजारच्या गाडीवर एक मुलगी आणि एक आजी होत्या. ऊन फार नव्हते पण पाणी-पाणी होऊ शकणार होते. आजी त्या मुलीला म्हणाल्या की 'अगं!! पाण्याची बाटली विसरलेच मी'.
वास्तविक त्या माझ्याशी काही बोलल्याच नव्हत्या पण मी खूप सहज बोलुन गेले की, 'माझ्याकडे आहेदेऊ का?' 
मी रोज तीन लिटर पाणी आणते Office लाम्हणजे 1.Ltr च्या तीन बाटल्या
त्या आजींना कळलें नाही हो म्हणावे का नाही. तोपर्यंत मी बाटली काढून त्यांच्या हातात ठेवली होती. त्यांना कदाचित हे सगळं अनपेक्षितच असेन
पण त्या म्हणाल्या, 'खूप लांब जायचय, नेमकी मी बाटली विसरून आले'. म्हणलं, 'हो मावशी! राहू दे ती बाटली ऊन आहेच, तहान लागणारच.' 
Signal सुटला आणि मी निघाले, निघताना मनात आलं, "माझ्या आईकडे खूप आहे..." 
आईने एक गोष्ट लहानपणा पासून सांगितली आहे. एक लहान मुलगा आईला लाडू मागतो. आई त्याला डब्यातून काढुन लाडू देते. तो बाहेर येतो, ओसरीवर कामवालीचा मुलगा खेळत असतो, त्या लहान मुलाचे देखील सतत लक्ष लाडू कडे असते म्हणून तो लहान मुलगा त्याच्या हातातला लाडू त्याला देऊन टाकतो आणि  त्याला सांगतो "माझ्या आईकडे खूप आहे." 
आई म्हणते, 'जर ह्या आईकडे खूप असेन तर मग जग चालवणाऱ्या त्या  माऊलीकडे किती असेनमग मी का माझा हात चोरून काही द्यावं?'
"देणाऱ्याने देत रहावे..." जे देण्यासारखे आहे ते निश्तिच देत रहावेकिती बरं झालं ना  सकाळी मी मयंकला त्या गाण्याचा अर्थ सांगितला,
कधी-कधी तर वाटतं आपण लहानमुलांना शिकवतो कमी आणि शिकतो जास्त
खरचं जे होते ते चांगल्यासाठीच

Wednesday, 1 November 2017

"नीरेची ताडी "


खाबुगिरीच्या कट्ट्यावर विविध गप्पा कायमच रंगतात... 

कुणाच्या आवडलेल्या भाजीची Recipe (जी कुणी क्वचितच करून बघेन),  कुणी केलेली नविन खरेदी (दुकान, किंमत, रस्ता, पेठ, एवढेच काय तर दुकानाच्या आजूबाजूचे खाबुगिरीची ठिकाणं इथं पर्यंत रंगलेली चर्चा ), कुणाचीतरी नुकतीच संपलेली Trip (बस बुकिंग पासून ते रिटर्न तिकीटापर्यंतच्या चौकश्या, जिथे कुणी डुंकूनही फिरकणार नाहीये) एखाद्या फेमस Serial च्या चर्चा. . 
ह्या कट्ट्यावर वेदांपासून ते वॉट्स अँप पर्यंत प्रत्येकच विषय अगदी जिव्हाळ्याने हाताळला जातो.. पण जर कधी कुठला विषय नाहीच मिळाला तर एक विषय मात्र चघळला जातोच जातो... तो म्हणजे "बँकेमधील Grade System"

ह्या व अश्या अनेक चर्चांचे माहेरघर असलेला हा खाबुगिरीचा कट्टा आणि ह्या कट्ट्यावर रमणारी विविध वर्गातील मंडळी आपल्या कामाच्या ठिकाणचे वातावरण ह्या सगळ्या गूढ चर्चां ने हलके करत राहते.. 

इथे वाढदिवसही साजरे होतात आणि सणही.. प्रत्येक जण दुसर्याच्या आवडीनिवडी जपतो आणि काळजीही घेतो.. इथे आनंदाचे आणि दुःखाचे क्षण देखील एकत्रित पणे जगले जातात... प्रत्येकालाच हा कट्टा म्हणजे आपले second home वाटतो.. 


सहसा, Tea - break आणि Lunch Break मध्ये हा कट्टा जमतो... पण रंगलेल्या विषयाची मात्र दिवसभर चर्चा होत राहते... एखादा, कधीही प्रत्यक्षात न येणारा  फिरण्याचा Plan ही इथेच Schedule होतो किंवा कधी एकत्र खरेदी कारण्याचा उत्साहही इथेच दिसतो. ह्या कट्ट्याचे वैशिष्टय आहे की इथे बँकेबाहेर ठरलेला Programme कधीच यशस्वी होत नाही..  सगळेच आरंभवीर.... अतिउत्साही लोकांना नाक मुरडणार्यांची साथ तर कोमल स्वरातील गपिष्टांना तारसप्तकातल्या स्वरांचा प्रतिसाद.... असा मिश्र वयोगट.. मिश्र लिंग व मिश्र स्वभावाच्या लोकांनी सजलेला हा कट्टा... 

एकदा खाबुगिरीची मैफिल रंगलेली असताना, सहजच ह्या कट्ट्यावर मद्यपानासारखा मादक विषय निघाला.... क्वचितच कधी मद्य पाहिलेली लोकं अतिविश्वसाने त्याविषयी बोलू लागले. त्यातच कुणीतरी म्हणाले "नीरेची ताडी होती"... 

बास मग ! तिथल्या तिथे दोन गट पडले... काही लोकं "हो होतेच" म्हणू लागले तर काही लोकं "नाही.. नाही होत" असे म्हणू लागले. मुळात ह्या चर्चेचा USP हा होता की त्यामध्ये सहभागी होणाऱ्या  कुणीच कधीही ना नीरा प्यायली होती ना तिला पाहिले होते. पण जर चर्चा करणाऱ्यांमध्ये जास्तीती जास्त वकील असतील..  तर ह्या गोष्टीचा अर्थाअर्थिच संबंध राहतो...  सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या ह्या हुशार मंडळींना आपण प्रत्यक्ष नीरेला न पाहता...  तिची चवही न घेता..  तिच्या विषयी छाती ठोकपणे ठाम मत सांगणे, म्हणजे "बाये हाथ का खेल... " 

मग Lunch Time ला छेडलेल्या या विषयाचे दिवसभर रवंथ झाले. भेटणाऱ्या प्रत्तेक माणसाला त्याचे ह्या विषयीचॆ Expert Opinion विचारले जाऊ लागले...  गंमत म्हणजे जास्तीत जास्त लोकं नीरा या शब्दाचा अर्थ "पाणीच ना" ह्या विचारसरणीचे होते. मग ह्या Experts ना आधी नीरा म्हणजे काय ते समजावून सांगण्यात आले त्यानंतर ताडी काय असते ते पण सांगावे लागले... हे दोन्ही सांगितल्यानंतर जास्तीत जास्त Experts ने "माहित नाही बुवा" असे आपले Expert Opinion दिले... 
त्यातच कुणीतरी म्हणाले, "नीरेची ताडी होतच असणार कारण संध्याकाळी कुठलेच नीरेचे दुकान नीरा विक्री करत नाही" आपल्या मताला दुजोरा देणारं मत मिळाल्याने नीरेची ताड़ी होतेच असं म्हणणाऱ्या गटाचा Confidence एकदम वाढला. मग अगदी इथपर्यंत जाहीर झाला की "दाखवा एखादं नीरेचे दुकान जे संध्याकाळी चालू असते आणि नीरा बक्षिस म्हणून मिळवा !!!" 

आता मात्र experiment करायची वेळ आली होती.. तेव्हा असे ठरले की सकाळी Office ला येताना कुणीतरी नीरा सोबत घेऊन यायची...  संध्याकाळ झाली की प्रत्येकाने Quarter-Quarter नीरा प्यायची  व आपआपल्या घरी जायचे आणि त्याचा जो परिणाम असेन त्याने स्पष्ट होइल की नीरेचे संध्याकाळपर्यंत काय होते....!! पण सगळ्याच आरंभवीरांनी हे ठरविल्याने हे कधीच होणार नाही हे काही वेगळ सांगायची आवश्यकता नाही.. 

पण, there was a point.. खरचं कुठलेच नीरेचे दुकान संध्याकाळी चालू नसते... आता खरंच निकाल लावण्याची वेळ आली होती.. तब्बल दोन दिवस रंगलेल्या या चर्चेचा निकाल लावायचा होता.. मग साक्षात Google देवाला विचारण्यात आले. तर Google नेही असेच सांगितले की "होय, सुर्यास्तानंतर नीरेची ताडीच होते" त्यातच काही अनुभवी लोकांचा त्याला दुजोरा मिळाला.. नीरा Ferment होते आणि म्हणून तिची ताडी होते. बहुतांश खाबुगिरीच्या काट्यावरील लोकांच्या मनात एकदा तरी हि नीरा किंवा ताडी पियुन बघितली पाहिजे अशी इचछा जन्माला घालून दोन दिवसापासून रंगलेल्या ह्या अत्यंत मादक चर्चची अखेर समाप्ती झाली.. 
तसही आमच्या खाबुगिरीच्या कट्ट्यावर प्रत्येक विषयाला इतके आंबवले जाते कि त्याची ताडी झाल्याशिवाय राहातच नाही.. निरागस हास्य आणि निष्कर्षहीन चर्चांने खाबुगिरीच्या कट्ट्यावर अश्या अनेक नीरांची हजारदा ताडी होते.....