Saturday, 17 March 2018

दंत - क (व्य) था

"Ouch" बडीशेप खाताना दातात कळ आली..
घाई घाईने जाऊन आरश्यात पाहिले तर बडीशेपचा कण दाढेत अडकला होता. तो काढताना अजुनच जोरात कळ आली...  दाढेचा एक तुकडा हलत होता...
अरे देवा..!!
डोळ्यांसमोर ब्रम्हांड दिसू लागले..
साधारण दीड वर्षांपूर्वी दातात अश्याच कळा येत होत्या. मग दाढ़ीचे Root Canal  करून घ्यायचे ठरले आणि नंतर Cap बसवायची.. Root Canal करुन घेण्यात अगदीच तत्परता दाखवली पण त्यानंतर Cap बसवण्यासाठी जायला मात्र लांबलं... 
एक दिवस Office मध्ये दुपारच्या वेळेला तोंडात काहीतरी आलय असं जाणवले... पाहिले तर लक्षात आले की त्या Root Canal  चे Filling आहे. आता तर Urgently Doctor ला दाखवणे भागच होते... असे Urgently doctor ची भेट घ्यायला मी माझ्या दाढेचा तुकडा पडेपर्यंत थांबले....
'Justice delayed is justice denied' या तत्वावर मी त्या Root Canal  केलेल्या दाढेवर अन्याय करत Cap बसवायला गेलेच नाही...
आता जेव्हा दाढेने असहकार चालू केला.. नुसताच असहकार  नव्हे तर सशस्त्र आंदोलन चालु केले, तेव्हा मला नाईलाजाने तिच्या उपचारासाठी doctor कडे जाणं भाग पडले..
Doctor च्या त्या प्रचंड अवजारे, Lights आणि नळ असलेल्या खुर्चीवर शांतपणे बसून राहिले... Doctor ने डोळ्यातल्या बुभूळांना अत्यंत त्रासदायक असा तो दिवा लावला आणि मी "आँ" करून त्या खुर्चीत पडून राहिले.
दातांच्या doctor चे मला भयंकर कौतुक वाटते... तन्मयतेने लोकांच्या "आ" केलेल्या तोंडात त्यांच्या दातांच्या अवस्था-दुरावस्था, कीड बघणे हेच आपले कर्तव्य ह्याची जाणिव ठेऊन लोकांच्या दातांकडे लक्षपूर्वक बघत असतात...
कधी-कधी तर गंम्मत वाटते ह्या दातांच्या doctor लोकांची, जर कधी कुणा बरोबर त्यांचे भांडणं होत असेन आणि जर ह्यांनी patients वर राग काढायचा ठरवला, तर दात पाडण्याचं स्वातंत्र्य "आ" करून बसलेल्या माणसाने आधीच दिलेले... रागही निघणार आणि दातही....!!!!!!
असो... माझ्या "आ" कडे बघून doctor ने निकाल सांगितला, माझ्या निष्काळजी पणाला वैतागुन माझ्या दाढेने जो विद्रोह केला आहे, तो विद्रोह तिला नेस्तानाबुत करुनच थांबवता येईल.
अरेरे..! मीच माझ्या दाढेचा बळी घेतला. आता काय करणार, दुसरा पर्याय आहे का विचारले पण doctor ने सांगितले, पर्यायाने दाढ तात्पुरता विद्रोह मागे घेईल. थोड्या दिवसाने परत पहिले पाढे...
'बरं' म्हणले आणि निकालाचा दिवस ठरवला. 
ठरल्या दिवशी ठरल्या वेळेत मी "आ" करून माझ्या दाढ़ीची शरणागती अनुभवायला खुर्चीत पडून राहिले. 
Procedure नुसार आधी X-ray काढायचा होता..
X-ray काढला आणि Doctor म्हणाले "Surprise!!!"
मी डोक्यालाच हात लावला म्हणलं, 'आता काय?'
Doctor म्हणाले, "ह्या दाढेला चिकटून अक्कल दाढ़ आहे जी हिरडीतुन बाहेरच आलेली नाहीये. जर फक्त ही दाढ़ काढली तर ती दुखावली जाणार आणि मग तिचा त्रास होणार"
"अरे बापरे..!"
म्हणजे माझ्या खिशाला बाम्बू आणि doctor ला "एक के साथ एक मुफ्त" वाली offer...
परत विचारले की 'दुसरा पर्यायच नाही का?'
Doctor म्हणाले 'नाही... Surgery शिवाय पर्यायच नाही'
Cap लावली असती तर एखाद दुसऱ्या हजाराचे काम, आता दुपटीने वाढले होते..
म्हणलं 'ठीके पण आजच 'तुकडा' पाडा....'
Doctor ने surgeon ची appointment घेतली. 
त्याच दिवशी उशिरा संध्याकाळी मी माझ्या दाढेचा तुकडा पाडून घ्यायला त्या surgeon पुढे "आ" करून उपस्थित झाले.
प्रस्थापित पद्धतीनुसार आधी Anesthesia दिला, तिनदा... 
भयंकर कडवट पाणी तोंडात जमा झालं.... 
मग माझ्या दंतपंगतींचे  उत्खनन चालू झाले, Anesthesia मुळे वेदनेची जाणिव नष्ट झाली होती.. 
पण जिभेच्या संवेदना, तोंडात जमा होणाऱ्या द्रव्य घटकांच्या चवीची जाणिव देत होत्या.... 
जिला पडायचे होते, ती माझी दाढ़.. अशी सहजासहजी शरण येईल का?
थोड्या वेळाने त्या surgeon ने माझा जबडा धरला आणि माझ्या दाढेला पूर्ण शक्ति लावून हलवले... 
मला, मी कुणीतरी राक्षसी आणि डॉक्टर म्हणजे हनुमान वाटू लागले..
ज्याचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी 'ब्रह्मांडे माईली नेणो, आवळे दंतपंगती' असे आधीच करून ठेवले आहे... 
थोड्या वेळाने त्या बिचाऱ्या जखमी  दाढेने हार मानली आणि ती धारातीर्थी पडली.
अक्कल दाढेचा निकाल मात्र माझ्यासाठीही गुपितच राहिला.. 
ह्या सगळ्या प्रक्रियेत मला पु. ल. देशपांडेची फार आठवण येत होती..
त्यांच्या 'मी आणि माझ्या शत्रुपक्षा' मध्ये त्यांनी, dentist ला का सहभागी करून घेतले नसेन ह्याचे मला आश्चर्य वाटले.. कदाचित पु. लं नी त्यांच्या दातांची उत्तम देख रेख केली असणार म्हणून त्यांना डेंटिस्ट शी युद्धच करावे लागले नसेन.. 
त्या काढलेल्या दाढांना मग टाके घातले गेले. ह्या सगळ्या प्रक्रियेत मी माझ्याच रक्ताच्या औषध मिश्रित चवी घेत होते. 
हे सगळं मी सहन करत होते, कारण मला वाटत होतं की आता मला दुखणार नाहीये...
पण म्हणतात ना, 'अज्ञानात सुख असते'.
हे सगळे झाल्यानंतर doctor ने मला समोर बसवून पथ्य सांगितले. 
खाण्या-पिण्याचे पथ्य तर होतेच पण दोन दिवस कमी बोलायाचे होते. ( हे ऐकताना मला माहित नव्हते की मला बोलताच येणार नाहीये ) 
मनात म्हणले बापरे! दाढही माझीच गेली, पैसेही माझेच गेले आणि शिक्षाही मलाच, (म्हणा इतरांना बरे)
पण 'ये तो होना ही था।' कर्म पण तसेच होते माझे.
त्यानंतर साधारण आठवडाभर मला रात्रीची झोप नाही मिळाली. pain killer घेऊन घेऊन भूकही लागत होती आणि खाताही येत नव्हते. पण त्यामुळे अशक्तपणा आला. तशीही सारखीच झोप येत असते पण गोळ्या घेऊन घेऊन सारखीच झोप येत होती, पण लागत मात्र नव्हती. असहय्य वेदना होण्याचा काळ चालु झाला. doctor कडे जाऊन टाके काढून टाकले तेव्हा जरा दुखणे कमी झाले, पण गोळ्या घ्याव्याच लागत होत्या.
दाढ़ काढल्या नंतर दोन आठवडे गोळ्या घेऊन प्रचंड उष्णता वाढवून, सतत कान दुखवत ठेवून दाताच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही हा कानाला खडा आणि मिळालेला धडा !!!!!

Monday, 12 March 2018

The Boss

'एक काम कर, उलटं करून बघ'  "Madam" चे  हे patented वाक्यं.. 
Problem कोणताही असो  solution ची guarantee.. Personal problem असो  वा legal complications.. Madam कडे  'हर  दर्द  का इलाज'.. 
हुद्द्याने Boss पण  वागणुकीने मैत्रीण.. 
सगळ्यांना जीव लावणाऱ्या आणि सगळ्यांचा  जीव  ज्यांच्यात गुंतलाय अश्या  Department Head पण त्याहीपेक्षा खाबुगिरीच्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुख..
एखाद्या Bossची  जशी  प्रतिमा एखाद्याच्या डोक्यात तयार असेन त्याच्या अगदी विरुद्ध.. 
पण एखादा 'leader' जसा असायला हवाय तश्याच...
सगळ्यांचे गुणदोष जाणून घेऊन, प्रत्येकाच्या गुणांनुसार त्याला काम वाटून देणे.. एखादं  काम एखाद्याला नाही समजले तर त्याला समजेपर्यंत ते समजावून सांगणे.. प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेणे, आपण इथे दिवसभर असतो आणि ज्यांच्या बरोबर काम करतो ती लोकं आपलं  कुटुंबच आहेत असा मानणाऱ्या.. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या.. आठवणीने सगळ्यांसाठी खाऊ आणणाऱ्या.. 
अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या.. कामाची व्यवस्थापन बघून प्रत्येकाच्या सुट्ट्या "manage" करणे..  
म्हणजे साधारण पणे Boss ला न शोभणाऱ्या सगळ्याच गुणांनी युक्त अश्या सगळ्यांच्याच आवडीच्या Boss...
स्त्री ही   भगवंताची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे, पण मला वाटायचे अश्या कलाकृत्या आता फक्त पुस्तकातच सापडतात.. पण madam ना भेटल्यानंतर कळले की स्त्रीला भगवंताची सर्वोत्कृष्ट कलाकृती का म्हणले असेन.. "Bodily beauty has the limitation of age.. But the beauty of brain increases with age".. madamच्या बाबतीत हे तंतोतंत खरेआहे.. 
एखादी नदी ज्याप्रमाणे अविश्रांत वाहत रहाते तश्या madam अविश्रांत कामात असतात... अगदी तहान भूक हरवून.. मला कायमच कौतुक वाटत आलय... एका वेळी सगळेच ज्ञानेन्द्रिये कसे काय कुणाला जागरूक ठेवता येत असतील!!!
पण madam नी ही कला, लीलया आत्मसात केलीये..
त्या एकाच वेळेला दोन फोन वर बोलू शकतात आणि फोन वर बोलता बोलता एखादा draft चे काम करू शकतात... एखादी file वाचता वाचता एखाद्या email ला reply करू शकतात तर दुसरीकडे आपल्या कन्यारत्नांशी हितगुज पण साधू शकतात.. 
कधी-कधी तर मला वाटतं madam चा मेंदू कधी झोपत असेन का ह्याचं संशोधन एखाद्या scientist ला सांगावे!!!!
Madam office मध्ये प्रचंड कामात असतात.. सहाजिकच आहे.. BOSS ना खुप काम असणे अपेक्षितच  आहे...पण गम्मंत म्हणजे त्या त्यांच्याकडचे काम स्वतः करतात... 
त्यांच्या कामासाठी इतरांवर अवलंबूनही रहात नाहीत आणि स्वता:ची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतही नाहीत.. 
निट-नेटकेपणा, कामा मध्ये प्रचंड शिस्त आणि अफाट स्मरणशक्ती.. 
कधी वाटतं madam च्या मेंदूच्या आत मध्ये खूप कप्पे असणार.. म्हणजे आपण कसे कपडे छान घडी करून आवरून ठेवतो तसे madam च्या मेंदू मध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे कप्पे असणार.. ते कप्पे पण नीट आवरलेले.. कारण कधीही ,कोणताही विषय काढ़ा.. Madam तातडीने त्यावर discussion करू शकतात.. चर्चा संपली की तो विषय परत मेंदू मध्ये त्या-त्या कप्प्यात.. मग असे किती कप्पे असतीन ना madam च्या मेंदूत!!!
प्रत्येक file चा कप्पा वेगळा.. त्यात आज पर्यन्त त्यांनी शेकडो files केल्या असतील या सगळ्या त्यांना लक्षात असतात.. बास...! सामान्य माणसाच्या मेंदूची capacity इथेच संपली.. 
पण madam तर THE BOSS आहेत.. त्यांच्या मेंदूत प्रत्येक file चा वेगळा कप्पा.. प्रत्येक माणसाचा त्या माणसाच्या आयुष्यातील घटनांचा.. आपल्या लेकींचा.. आई-वडिलांचा सासु-सासऱ्यांचा.. सगळ्यांचा वेगळा कप्पा.. Madam चे wardrobe चांगलेच मोठे असणार..
नाहीतर आमचे!!! एकच मोठा कप्पा त्यातच सगळं भसाभस कोंबून ठेवलेले..
Madam चे अजुन एक वैशिष्ट्य.. त्या कधीच कुणाला वाईट वाटेन अश्या आवाजात बोलत  नाहीत आणि हुद्दा मोठा आहे म्हणून कुणाला अपमानास्पद वागवताही नाहीत प्रत्येकाचं मन जपतात आणि आवडी-निवडीही..
त्यांच्या कामात त्या इतक्या प्रामाणिक आहेत की बर्याचदा घरी  office च काम घेऊन जातात..
समाजात असा समज आहे की एखादी स्त्री  office मध्ये कामात चांगली असेन, तिला कामात सतत प्रगति आणि तिचे कौतुक जर का होत असेल तर त्या स्त्री ला घरकाम आणि संसार ह्या गोष्टीत रस नसतो.. पण  madam चे असे नाही.. त्या त्यांची प्रत्येक जबाबदारी प्रेमाने आणि काळजीने हाताळतात..सतत उत्साही आणि आनंदी... निरपेक्ष वृत्ती.. प्रेमळ पत्नी.. करुणामय आई.. जबाबदार मुलगी.. कर्तव्यदक्ष सून.. सहज मैत्रीण.. शिस्तप्रिय अधिकारी आणि जागरूक नागरिक, जीवनातल्या प्रत्येकच कसोटीला उत्तमपणे सामोरे जाणार्‍या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अष्टपैलू स्त्री.. 'जीवन किती जगले यापेक्षा ते कसे जगले यातच जीवनाची सार्थकता' हे समजून जीवनाचा आदर ठेवणार्‍या. 
काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असे वाटतच असते कि work life balance कसा साधायचा?? अश्या प्रत्येक स्त्री साठी एक आदर्श .. उत्तम गृहिणी आणि सर्वोत्तम Boss..
नुकताच महिला दिन  झाला.. तो साजराही झाला.. पण महिला दिन फक्त एकमेकींना शुभेच्छा देऊन किंवा स्त्रीला कशी समान वागणूक मिळाली पाहिजे यावर चर्चा करून साजरा करण्यापेक्षा.. जी स्त्री शक्तीआपल्याला रोज प्रेरणा देते त्या आईला, सासूला, बहिणीला, मैत्रिणीला आणि madam सारख्या अनेक स्त्रियांनप्रति कृतज्ञता व्यक्त करून  (फक्त पुरुषांनी न्हवे तर स्त्रियांनी सुद्धा) साजरा केला, तर तो खरचच साजरा होईल..