Thursday, 21 December 2017

"मापात जरा चुकलय"

"असं कसं माप चुकलं?" घरातले सगळेच "ती" च्या अंगावर आले... ती बिचारी हिरमुसली... 
आता नवरा काय म्हणेन म्हणुन जरा चिंतेत होती...

मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे 
म्हणून "तीखास खरेदी करण्यासाठी गेली.
 तिचा स्वभाव निरागस.. लहान-लहान गोष्टीत खुश होणारी... 
प्रत्येकाची काळजी करणारी आणि प्रत्येकाकडे लक्ष देणारी.... प्रत्येकाने आनंदी असावं असं मनापासून चिंतणारी.. 
आज मात्र स्वता:साठी Tops घ्यायला गेली... 
खरेदी हा जसा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय तसा तिचाही..
 खुश होती..
 खरेदी करणार म्हणून आणि ख़ुशी खुशीतच बरीच खरेदी केली.. 
साधारण सहा Tops घेतले...
 साध्या दुकानातल्या Trial Rooms मध्ये कपडे Try करायचे नाहीतम्हणून Try  करताच विकत घेतले.(Social Media मुळे जी जागरूकता निर्माण झालेली आहे त्याचेच हे पडघम की साध्या दुकानात Trial Rooms मध्ये Try नाही करायचे.)

घरी गेली... उत्सुकतेने सगळे घालून पाहिले...  तर तिला त्यातले दोनच निट बसले... बाकीचे मापात 'जराचुकले.... 

"L" size Or "XL" Size चे Tpos तिला सहज येतील पण तिने "S" Or "XS" आणले..!! 
पहिल्यांदाच खरेदीला गेली नव्हतीपण आज अंदाज जरा (जास्तचचुकला... ! 
आता सोळा सतारा वर्षाच्या मुलीकडून असे होणे साहजिक आहे... 
पण साधारण चाळिस वर्षाच्या बाई कडून असे होणे.. मजेदार आहे!!!!!

घरातले सगळेच 'असं कसं' 'असं कसंम्हणु लागले..  मनात हसू लागले.. तिला आता ते Tops परत करण्यासाठी जाणं भाग होतं... कामासाठी मुंबईत असलेल्या नवऱ्याला तिने घडलेल्या प्रसंगाचा इति वृतांत दिला... 

त्याची प्रतिक्रिया (तिथे बसूनस्वाभाविकच होती... "चुकत अगं माप ! बदलून आण ते !" 
मनात म्हणाला 'वाचलो बुवा'!
तिने रात्री विचार केला, 'तसही आपण हे बदलून तर आणणार आहोतमग आपल्या Office मध्ये विचारून बघुयात की कुणाला हवे आहे का?' 
असा 'निरागसविचार करून ती शांतपणे निद्रावश झाली.

सकाळी उठून आवरून Office मध्ये येऊन धडकली... रोजच्या व्यवहारात आणि मैत्रीतसुद्धा औपचारिकता पाळणे हा तिचा स्वभाव असल्याने आपल्या मित्रमंडळींना Tops विषयी सांगण्यासाठी Lunch Time ची वाट बघितली...
जेवता जेवता सहजच तिने सांगितले की "काल मी खरेदीला गेले होते आणि काही Tops मापात चुकलेजर तुम्हाला कुणाला आवडले तर ठेवुन घ्या नाहीतर मी तसेही बदलणार आहेच."
Tops आणि खरेदी हा जिव्हाळयाचा विषय असल्याने सर्वानाच त्यात रस होता!!! 

सगळ्यांनीच प्रश्न विचारलेरंग,किंमत, Quality इत्यादी..... 
तर तिने त्यातल्या त्यात "M " किंवा  "L" size असलेल्या मैत्रिणींना सांगितले की नाही तुम्हाला नाही बसणार.! 
आता एक स्वाभाविक प्रश्न पडला की जर तिच्या मापात चुकले असतील तर थोडे फार इकडे तिकडे झाले असतीं.. 
मग तिच्यापेक्षा एक size कमी असलेल्यांना आले पाहिजेतपण तिने नाकारले... 
आणि आपल्या अश्या मैत्रिणींकड़े मोर्चा वळवला की ज्यांना साधारण 'xs' or 's' size लागत असेन अश्या मुली आहेत....! 
त्या मैत्रिणी म्हणल्या "ठीके!!!!! Tops बघून ठरवतो !" 
जेवण झालेती दुकान उघडून बसली.... 
दिसायला तरी छानच होते ते tops !!!!
पण जेव्हा उघडून बघितलेतेव्हा क्षणभर शांतता होती...  पण नंतर प्रचंड हशा पसरली!!!!!
आणि तिच्यावर विविध टोमण्यांची बरसात झाली.. 
पण सगळ्यांची सुरुवात "असं कसं माप चुकलं?" अशीच होती... 
'आरश्यात बघतच नाहीस  का तु?'....  'तुला काय वाटलंघरी जाई पर्यंत बारीक़ होशील का?'.... 
'चष्मा लागला आता'... 'दुकानदाराने लेकीसाठी विकले असेन!'....

तिला कळत होतं की आता आपल्याला हे ऐकवं लागणारच आहेपण मुळचा मुंबईचा पिंड.. पुणेरी टोमणे कितपत ऐकणार??? 

तिने शेवटी आपल्या परोपकारी वृत्तीची वकिली करायला सुरुवात केली,'मी एवढं आणलं तुम्हाला घेता यावं म्हणून आणि तुम्ही बघा कसे बोलत आहात ते??' 
पण आपला आपल्याच विषयीचा अंदाच चुकला म्हणून हे मापात चुकलेले tops आपल्याला इंथ आणावे लागले हे मनात तिला माहित होते.

तिच्या मैत्रिणींपैकी तिच्या बरोबर अर्ध share करणारी मैत्रिण मदतीला धावून आली... तिने त्यातले अर्धे top (म्हणजे चारातले दोनघेतलेतिच्या लेकीच्या वाढदिवसा निमित्त.... 

अजुन एका मैत्रिणीने एक घेतला....  "ती"ला जरा दिलासा वाटला... 
शांतपणे काम करून घरी गेली आणि  दुसऱ्यादिवशी office मध्ये आली तर तिला असे कळले कीजिच्या वाढदिवसासाठी मैत्रिणीने Top घेतले होतेतिलाही त्यातला एक नीटसा बसला नाही!!!!!!
परत एकदा टोमण्यांची बरसात झाली... 
मैत्रिणीची मुलगी म्हणाली, "आईमावशीचा इतका कसा अंदाज चुकला?"

मुळात तिलाते Tops, Office मध्ये आणताना हे माहित होत की ती " माकडांच्या हातात कोलीत देत आहे." पण तरीही तिने ते दिले... 


कारण आपली लोकं आपल्यावर हसली तरी ती हसत आहेत... आनंदी होत आहेत ह्याचा तिला आनंद होता... आपल्यावर हसत असले तरी आपल्यामुळे हसत आहेत हे तिला खुप समाधानकारक होत....

Tops 'मापात जरा चुकले होते', पण आयुष्याच्या मापात ती बरोबर होती..!!


तिरडी

अधून मधून येणारा हुंदक्यांचा आवाज... 
सांत्वनाचे बोल... 
न आवारता येणारा हंबरडा.. 
देवाशी मनात चाललेला झगडा... 
पोरकेपणाची आंतरिक आणि खोल भीती.. 
एकटेपणाच भविष्य... 
आयुष्यातील पोकळी... 

प्रचंड गर्दी, आतही आणि बाहेरही.. 
आत आठवणींची आणि बाहेर लोकांची.. 
प्रचंड गर्दी तरीही भयाण शांतता.. 
प्रत्येक नात्याच्या डोळ्यात तीव्र दुःखाची झाप आणि मनात आठवणींची आद्रता ... 
कटू गोड अश्या आठवणींचा समूह.. 

न आवरता येणारं दुःख.. 
रिकामी झालेली आणि कधीही न भरता येणारी आयुष्यातील आणि मनातील जागा... 

या सगळ्या भावनांमध्ये.. 
श्वास घेणार्‍या जिवात, मधोमध सांसारिक बंधनातून सुटलेला, प्रसन्न चेहर्‍याचा तो निःश्वास देह..
आणि दारात त्या देहाला नेण्यासाठीची तिरडी...
त्या देहाच्या शेवटच्या प्रवासाचे वाहन...

तिरडी बांधे पर्यंत पुन्हा शांतता आणि बारीक हुंदके..
पण 'रामा'चे नाव कानी पडताच हुंदक्यांचा फुटलेला बांध आणि त्याचे हंबरड्यात झालेले रौद्ररूपांतर...

ह्या सगळ्या कल्लोळात निघालेली ती तिरडी..
आणि त्याच वेळी शेजारच्या घरात बाळाचा आवाज.......... 


Wednesday, 22 November 2017

Every Thing happens for a good reason

सकाळी सकाळी मयंकला "हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण!" ह्याचा अर्थ सांगताना खूप सहज बोलून गेले की 'देता आले पाहिजे'. देण्यातच खरा आनंद आहेमयंकला ते कळले का नाही हा प्रश्न मला खूप उशिरा पडला पण त्याआधी, 'मी तशी आहे का?' असं वाटलं.. 
कुणी मला काय दिलय, म्हणून मी कुणाला काही द्यावंअसं वाटणाऱ्यांनी देण्याच्या नादीच लागू नयेकारण ते फक्त मत्सर आणि इर्षा देतील
"देणंम्हणजे प्रत्येकच वेळेला कोणतंही अर्थसहाय्य असलं पाहिजे असं नाही
देण्यात प्रेमआशाआनंदमैत्री याही गोष्टी येतातकदाचित मला देण्याच्या त्या स्थितीत यायला अवकाश असेन, पण देण्यातल्या त्या आनंदाला मला मुकायच नाही
हा विचार डोक्यात चालू असतानाच मी Signal ला येऊन थांबले आणि शेजारच्या गाडीवर एक मुलगी आणि एक आजी होत्या. ऊन फार नव्हते पण पाणी-पाणी होऊ शकणार होते. आजी त्या मुलीला म्हणाल्या की 'अगं!! पाण्याची बाटली विसरलेच मी'.
वास्तविक त्या माझ्याशी काही बोलल्याच नव्हत्या पण मी खूप सहज बोलुन गेले की, 'माझ्याकडे आहेदेऊ का?' 
मी रोज तीन लिटर पाणी आणते Office लाम्हणजे 1.Ltr च्या तीन बाटल्या
त्या आजींना कळलें नाही हो म्हणावे का नाही. तोपर्यंत मी बाटली काढून त्यांच्या हातात ठेवली होती. त्यांना कदाचित हे सगळं अनपेक्षितच असेन
पण त्या म्हणाल्या, 'खूप लांब जायचय, नेमकी मी बाटली विसरून आले'. म्हणलं, 'हो मावशी! राहू दे ती बाटली ऊन आहेच, तहान लागणारच.' 
Signal सुटला आणि मी निघाले, निघताना मनात आलं, "माझ्या आईकडे खूप आहे..." 
आईने एक गोष्ट लहानपणा पासून सांगितली आहे. एक लहान मुलगा आईला लाडू मागतो. आई त्याला डब्यातून काढुन लाडू देते. तो बाहेर येतो, ओसरीवर कामवालीचा मुलगा खेळत असतो, त्या लहान मुलाचे देखील सतत लक्ष लाडू कडे असते म्हणून तो लहान मुलगा त्याच्या हातातला लाडू त्याला देऊन टाकतो आणि  त्याला सांगतो "माझ्या आईकडे खूप आहे." 
आई म्हणते, 'जर ह्या आईकडे खूप असेन तर मग जग चालवणाऱ्या त्या  माऊलीकडे किती असेनमग मी का माझा हात चोरून काही द्यावं?'
"देणाऱ्याने देत रहावे..." जे देण्यासारखे आहे ते निश्तिच देत रहावेकिती बरं झालं ना  सकाळी मी मयंकला त्या गाण्याचा अर्थ सांगितला,
कधी-कधी तर वाटतं आपण लहानमुलांना शिकवतो कमी आणि शिकतो जास्त
खरचं जे होते ते चांगल्यासाठीच