"असं कसं माप
चुकलं?" घरातले सगळेच "ती" च्या अंगावर आले... ती बिचारी हिरमुसली...
आता नवरा काय म्हणेन म्हणुन जरा चिंतेत होती...
मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे
म्हणून "ती" खास खरेदी करण्यासाठी गेली.
तिचा स्वभाव निरागस.. लहान-लहान गोष्टीत खुश होणारी...
प्रत्येकाची काळजी करणारी आणि प्रत्येकाकडे लक्ष देणारी.... प्रत्येकाने आनंदी असावं असं मनापासून चिंतणारी..
आज मात्र स्वता:साठी Tops घ्यायला गेली...
खरेदी हा जसा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय तसा तिचाही..
खुश होती..
खरेदी करणार म्हणून आणि ख़ुशी खुशीतच बरीच खरेदी केली..
साधारण सहा Tops घेतले...
साध्या दुकानातल्या Trial
Rooms मध्ये कपडे Try करायचे नाहीत, म्हणून Try न करताच विकत घेतले.(Social Media मुळे जी जागरूकता निर्माण झालेली आहे त्याचेच हे पडघम की साध्या दुकानात Trial Rooms मध्ये Try नाही करायचे.)
घरी गेली... उत्सुकतेने सगळे घालून पाहिले... तर तिला त्यातले दोनच निट बसले... बाकीचे मापात 'जरा' चुकले....
"L" size Or
"XL" Size चे Tpos तिला सहज येतील पण तिने "S" Or "XS" आणले..!!
पहिल्यांदाच खरेदीला गेली नव्हती, पण आज अंदाज जरा (जास्तच) चुकला... !
आता सोळा सतारा वर्षाच्या मुलीकडून असे होणे साहजिक आहे...
पण साधारण चाळिस वर्षाच्या बाई कडून असे होणे.. मजेदार आहे!!!!!
घरातले सगळेच 'असं कसं' 'असं कसं' म्हणु लागले.. मनात हसू लागले.. तिला आता ते Tops परत करण्यासाठी जाणं भाग होतं... कामासाठी मुंबईत असलेल्या नवऱ्याला तिने घडलेल्या प्रसंगाचा इति वृतांत दिला...
त्याची प्रतिक्रिया (तिथे बसून) स्वाभाविकच होती... "चुकत अगं माप ! बदलून आण ते !"
मनात म्हणाला 'वाचलो बुवा'!
तिने रात्री विचार केला, 'तसही आपण हे बदलून तर आणणार आहोत. मग आपल्या Office मध्ये विचारून बघुयात की कुणाला हवे आहे का?'
असा 'निरागस' विचार करून ती शांतपणे निद्रावश झाली.
सकाळी उठून आवरून Office मध्ये येऊन धडकली... रोजच्या व्यवहारात आणि मैत्रीतसुद्धा औपचारिकता पाळणे हा तिचा स्वभाव असल्याने आपल्या मित्रमंडळींना Tops विषयी सांगण्यासाठी Lunch Time ची वाट बघितली...
जेवता जेवता सहजच तिने सांगितले की "काल मी खरेदीला गेले होते आणि काही Tops मापात चुकले, जर तुम्हाला कुणाला आवडले तर ठेवुन घ्या नाहीतर मी तसेही बदलणार आहेच."
Tops आणि खरेदी हा जिव्हाळयाचा विषय असल्याने सर्वानाच त्यात रस होता!!!
सगळ्यांनीच प्रश्न विचारले. रंग,किंमत, Quality इत्यादी.....
तर तिने त्यातल्या त्यात "M
" किंवा "L" size असलेल्या मैत्रिणींना सांगितले की नाही तुम्हाला नाही बसणार.!
आता एक स्वाभाविक प्रश्न पडला की जर तिच्या मापात चुकले असतील तर थोडे फार इकडे तिकडे झाले असतीं..
मग तिच्यापेक्षा एक size कमी असलेल्यांना आले पाहिजेत, पण तिने नाकारले...
आणि आपल्या अश्या मैत्रिणींकड़े मोर्चा वळवला की ज्यांना साधारण 'xs' or 's'
size लागत असेन अश्या मुली आहेत....!
त्या मैत्रिणी म्हणल्या "ठीके!!!!! Tops बघून ठरवतो !"
जेवण झाले, ती दुकान उघडून बसली....
दिसायला तरी छानच होते ते tops !!!!
पण जेव्हा उघडून बघितले, तेव्हा क्षणभर शांतता होती... पण नंतर प्रचंड हशा पसरली!!!!!
आणि तिच्यावर विविध टोमण्यांची बरसात झाली..
पण सगळ्यांची सुरुवात "असं कसं माप चुकलं?" अशीच होती...
'आरश्यात बघतच नाहीस का तु?'.... 'तुला काय वाटलं! घरी जाई पर्यंत बारीक़ होशील का?'....
'चष्मा लागला आता'... 'दुकानदाराने लेकीसाठी विकले असेन!'....
तिला कळत होतं की आता आपल्याला हे ऐकवं लागणारच आहे. पण मुळचा मुंबईचा पिंड.. पुणेरी टोमणे कितपत ऐकणार???
तिने शेवटी आपल्या परोपकारी वृत्तीची वकिली करायला सुरुवात केली,'मी एवढं आणलं तुम्हाला घेता यावं म्हणून आणि तुम्ही बघा कसे बोलत आहात ते??'
पण आपला आपल्याच विषयीचा अंदाच चुकला म्हणून हे मापात चुकलेले tops आपल्याला इंथ आणावे लागले हे मनात तिला माहित होते.
तिच्या मैत्रिणींपैकी तिच्या बरोबर अर्ध share करणारी मैत्रिण मदतीला धावून आली... तिने त्यातले अर्धे top (म्हणजे चारातले दोन) घेतले. तिच्या लेकीच्या वाढदिवसा निमित्त....
अजुन एका मैत्रिणीने एक घेतला.... "ती"ला जरा दिलासा वाटला...
शांतपणे काम करून घरी गेली आणि दुसऱ्यादिवशी office मध्ये आली तर तिला असे कळले की, जिच्या वाढदिवसासाठी मैत्रिणीने Top घेतले होते, तिलाही त्यातला एक नीटसा बसला नाही!!!!!!
परत एकदा टोमण्यांची बरसात झाली...
मैत्रिणीची मुलगी म्हणाली, "आई, मावशीचा इतका कसा अंदाज चुकला?"
मुळात तिला, ते Tops,
Office मध्ये आणताना हे माहित होत की ती " माकडांच्या हातात कोलीत देत आहे." पण तरीही तिने ते दिले...
कारण आपली लोकं आपल्यावर हसली तरी ती हसत आहेत... आनंदी होत आहेत ह्याचा तिला आनंद होता... आपल्यावर हसत असले तरी आपल्यामुळे हसत आहेत हे तिला खुप समाधानकारक होत....
Tops 'मापात जरा चुकले होते', पण आयुष्याच्या मापात ती बरोबर होती..!!
Mast
ReplyDeleteJabardast... Fantastic.. Purne scene dolyasamor aala
ReplyDeleteJabardast... Fantastic.. Purne scene dolyasamor aala
ReplyDelete