Friday, 23 November 2018

बोक्या

"बोक्या अरे गप्प बस जरा", madam ने बोक्याला ईशारा केला..
पण हा बोका काही गप्पं बसणाऱ्यातला न्हवता..
कोणताही विषय चाललेला असूदेत हा बोक्या सतत आपलं गुरगुरणं चालू ठेवणार..
office मधला स्वतःचा cube आणि आजूबाजूचे cube, सगळीकडे या बोक्याचा दंगा सतत चालू असणार..
बघावं तेव्हा बडबड बडबड बडबड आणि तीही मोठमोठ्याने...
स्वतःच्या अस्तित्वाचा चुकूनही कुणाला विसर पडू नये याची तो काळजी घेणार..
बोक्या तसा कलाकार, दिसण्यात हुबेहूब शिवाजी महाराज, नाटकात त्यांचे कामही करणार.. पण वाचनाचा भयंकर कंटाळा..
खेळाची प्रचंड आवड असणारा हा बोक्या, ऑफिस कडून बरेचसे खेळ खेळत असे.. व्यायामाची आवड आणि आहारावर नियंत्रण हे बोक्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल..
व्यायामाची भयंकर आवड असली आणि, किलोमीटर च्या किलोमीटर धावत असला, सायकल चालवत असला तरी पण शेजारच्या cube मध्ये जाऊन light बंद करायचा ह्याला भयंकर आळस... ती बंद करायला नेहमी कुणाच्या ना कुणाच्यातरी मागे लागणार पण चुकूनही स्वतः बंद करायला नाही जाणार..
Non veg खायला प्रचंड आवडणार, पण ते खाण्यासाठीही वारांचे पथ्य पाळणार, जास्तीत जास्त उपास तापास करणारा हा पापभिरू पण स्वच्छंदी बोक्या सगळ्यांचाच लाडका असणार...
खाण्याची आवड आणि तरीही आहारावर नियंत्रण ही कसब बोक्याला हुकुमी जमली असली तरी उपवासाच्या दिवशी आवडीच्या पदार्थांचा वास आला की हा उल्हासित होणार, पण निष्ठेने उपवास करत राहणार...
गोड  बोलून स्वतःचं काम कसे करून घ्यायचे ही कला बोक्याला फारच छान जमते.. आणि आपलं काम होई पर्यंत त्या काम करणाऱ्या व्यक्तीचा पिच्छा करत राहण्याची निष्ठा सुद्धा बोक्यामध्ये प्रचंड दिसते...
मन मोकळा, बिनदास्त आणि अतिशय बोलका स्वभाव... सतत कुणाची ना कुणाची खोडी काढत राहणार.. प्रत्येकाला डीवचण्याचे त्याचे कारण मात्र ठरलेले असणार... आणि मग मोठ मोठ्या आवाजात संपूर्ण मजल्याला कळेल, असे भांडत राहणार..
या बोक्याची मनीमाऊ मात्र पोलीस खात्यात, तेही मुंबईला नोकरी करणारी, त्यामुळे सतत तिच्या विरहात सुट्टीची वाट बघणारा.. तिच्या विरहात अधून मधून उदास होणारा आणि ती ज्या दिवशी येणार असेल त्या दिवशी लहान मुलांसारखा खुश असणारा..

मुळात मनासारखे जगणारा.. आयुष्यात असतीलही अडचणी पण सतत हसत राहणारा.. ऑफिसमध्ये एखादा दिवस बोक्या उदास असला तर सगळीकडे असह्य शांतीची लाट पसरणार... आणि कधी बोक्या कामाला आलाच नाही तर सगळ्यांनाच चुकल्यासारखे वाटणार..
हा बोका कुणाला पटत असेल किंवा नसेल.. हा ज्याचा त्याचा प्रश्न.. पण आपल्या अस्तित्वातलं चैतन्य मात्र हा सर्वत्र पसरवत राहणार..

4 comments: