Wednesday, 6 November 2024

समान व्यसनेषु सख्यम्

मध्ये office च्या एका outing ला गेलो होतो. Lavala मध्ये.
खरच निसर्ग रम्य आणि शांत ठिकाण. रोजच्या gardi पासून आणि दगदगी पासून आराम. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची थोडासा विराम!
पोहोचे पोहोचे पर्यंत दुपार झाली. स्वच्छ आणि मोकळे वातावरण होते. लोकं पोहोचल्या पोहोचल्या मस्त खेळायला लागले. खेळ हा कधी पण मनांना जवळ आणतो आणि मैत्री दृढ करतो. पण त्या दिवशी अजून एक गोष्ट जाणवली, व्यसनं सुद्धा मैत्री दृढ करतात. दोन सिगारेट ओढणारे पटकन मित्र होतात. दारु प्यायला लोकं लवकर एकत्र येतात आणि कुठूनही पोहचतात त्यात ह्या व्यसना साठी आपल्या खिशाला भार येणार नसेल तर संपलाच विषय ! अमर्यादाला कुठल्या आल्या मर्यादा!
एवढ्या सुंदर वातावरणाला आपण प्रदूषित करतोय ह्याची एकालाही जाणीव नाही. रोजच्या दगदगीत रोज कुरकुर करायची की आम्हाला कशी शांती नाही निवांत पणा नाही आणि जिथे थोडे निवांत झालो शांती मिळाली की तिथे लगेच जास्तीच जास्त अशांती कशी पसरवता येईल हेच बघायचे. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय!
पण अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.. आज काल हे सामान व्यसनेषु फक्त आयुष्य नासवणार्‍या गोष्टीत आहे. एखादं गाणं आवडलं किंवा एखादा गायक आवडला किंवा एकमेकांचा छंद मनाला भावला किंवा एखादा वक्ता आवडला म्हणून ही मैत्री होऊ शकते की!
फिरण्याचे ही व्यसन असू शकते आणि वाचनाचे ही असू शकते!
फक्त ही व्यसनं अनुभूती देतात दाखवता येत नाहीत. आणि देखाव्याचा ह्या दुनियेत आयुष्याला गती देणारी व्यसने ही लाजिरवाणी आहेत. एक सिगारेट हातात किंवा एक ग्लास हातात धरून फोटो काढणे जगाला दाखवणे ha trend जास्त सोपा आहे. हवा झाली पाहिजे!
खरं तर हातात भगवद्गीता घेऊन फोटो काढला तरी हवा होतेच की पण त्याने आपण आध्यात्मिक किंवा धार्मिक पण होतो आणि आपल्याला trendy मित्र मिळत नाहीत. त्यामुळे अशी हवा झालेली चालत नाही.
माझ्या संस्कृतीने मला राम आणि सुग्रीवाची मैत्री शिकवली.. कृष्ण सुदाम्याची मैत्री शिकवली.
जी तुम्हाला जे आवडतंय ते करण्यास प्रोत्साहन तर देतेच पण जे योग्य आहे ते करण्यास प्रेरणा पण देते.
समान विचार, समान समान आचार समान छंद आणि ह्यातून स्वतःला अंतर्मुख होण्यास भाग पाडून जी आपली आंतरिक प्रगती करते ती मैत्री.. बाकी स्वार्थासाठी ज्या होतात त्या फक्त ओळखी!


1 comment:

  1. विचार करण्या सारखा विषय आहे
    विषय गंभीर पण गंधाली खंबीर

    ReplyDelete