अधून मधून येणारा हुंदक्यांचा आवाज...
सांत्वनाचे बोल...
न आवारता येणारा हंबरडा..
देवाशी मनात चाललेला झगडा...
पोरकेपणाची आंतरिक आणि खोल भीती..
एकटेपणाच भविष्य...
आयुष्यातील पोकळी...
प्रचंड गर्दी, आतही आणि बाहेरही..
आत आठवणींची आणि बाहेर लोकांची..
प्रचंड गर्दी तरीही भयाण शांतता..
प्रत्येक नात्याच्या डोळ्यात तीव्र दुःखाची झाप आणि मनात आठवणींची आद्रता ...
कटू गोड अश्या आठवणींचा समूह..
न आवरता येणारं दुःख..
रिकामी झालेली आणि कधीही न भरता येणारी आयुष्यातील आणि मनातील जागा...
या सगळ्या भावनांमध्ये..
श्वास घेणार्या जिवात, मधोमध सांसारिक बंधनातून सुटलेला, प्रसन्न चेहर्याचा तो निःश्वास देह..
आणि दारात त्या देहाला नेण्यासाठीची तिरडी...
त्या देहाच्या शेवटच्या प्रवासाचे वाहन...
तिरडी बांधे पर्यंत पुन्हा शांतता आणि बारीक हुंदके..
पण 'रामा'चे नाव कानी पडताच हुंदक्यांचा फुटलेला बांध आणि त्याचे हंबरड्यात झालेले रौद्ररूपांतर...
ह्या सगळ्या कल्लोळात निघालेली ती तिरडी..
आणि त्याच वेळी शेजारच्या घरात बाळाचा आवाज..........
वा.. शब्दच नाहीत .. अतिशय भावुक ..👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteChan
ReplyDeleteSurekhh
ReplyDelete