"Ouch" बडीशेप खाताना दातात कळ आली..
घाई घाईने जाऊन आरश्यात पाहिले तर बडीशेपचा कण दाढेत अडकला होता. तो काढताना अजुनच जोरात कळ आली... दाढेचा एक तुकडा हलत होता...

अरे देवा..!!
डोळ्यांसमोर ब्रम्हांड दिसू लागले..
साधारण दीड वर्षांपूर्वी दातात अश्याच कळा येत होत्या. मग दाढ़ीचे Root Canal करून घ्यायचे ठरले आणि नंतर Cap बसवायची.. Root Canal करुन घेण्यात अगदीच तत्परता दाखवली पण त्यानंतर Cap बसवण्यासाठी जायला मात्र लांबलं...
एक दिवस Office मध्ये दुपारच्या वेळेला तोंडात काहीतरी आलय असं जाणवले... पाहिले तर लक्षात आले की त्या Root Canal चे Filling आहे. आता तर Urgently Doctor ला दाखवणे भागच होते... असे Urgently doctor ची भेट घ्यायला मी माझ्या दाढेचा तुकडा पडेपर्यंत थांबले....
'Justice delayed is justice denied' या तत्वावर मी त्या Root Canal केलेल्या दाढेवर अन्याय करत Cap बसवायला गेलेच नाही...
आता जेव्हा दाढेने असहकार चालू केला.. नुसताच असहकार नव्हे तर सशस्त्र आंदोलन चालु केले, तेव्हा मला नाईलाजाने तिच्या उपचारासाठी doctor कडे जाणं भाग पडले..
Doctor च्या त्या प्रचंड अवजारे, Lights आणि नळ असलेल्या खुर्चीवर शांतपणे बसून राहिले... Doctor ने डोळ्यातल्या बुभूळांना अत्यंत त्रासदायक असा तो दिवा लावला आणि मी "आँ" करून त्या खुर्चीत पडून राहिले.
दातांच्या doctor चे मला भयंकर कौतुक वाटते... तन्मयतेने लोकांच्या "आ" केलेल्या तोंडात त्यांच्या दातांच्या अवस्था-दुरावस्था, कीड बघणे हेच आपले कर्तव्य ह्याची जाणिव ठेऊन लोकांच्या दातांकडे लक्षपूर्वक बघत असतात...
कधी-कधी तर गंम्मत वाटते ह्या दातांच्या doctor लोकांची, जर कधी कुणा बरोबर त्यांचे भांडणं होत असेन आणि जर ह्यांनी patients वर राग काढायचा ठरवला, तर दात पाडण्याचं स्वातंत्र्य "आ" करून बसलेल्या माणसाने आधीच दिलेले... रागही निघणार आणि दातही....!!!!!!

असो... माझ्या "आ" कडे बघून doctor ने निकाल सांगितला, माझ्या निष्काळजी पणाला वैतागुन माझ्या दाढेने जो विद्रोह केला आहे, तो विद्रोह तिला नेस्तानाबुत करुनच थांबवता येईल.
अरेरे..! मीच माझ्या दाढेचा बळी घेतला. आता काय करणार, दुसरा पर्याय आहे का विचारले पण doctor ने सांगितले, पर्यायाने दाढ तात्पुरता विद्रोह मागे घेईल. थोड्या दिवसाने परत पहिले पाढे...
'बरं' म्हणले आणि निकालाचा दिवस ठरवला.

ठरल्या दिवशी ठरल्या वेळेत मी "आ" करून माझ्या दाढ़ीची शरणागती अनुभवायला खुर्चीत पडून राहिले.
Procedure नुसार आधी X-ray काढायचा होता..
X-ray काढला आणि Doctor म्हणाले "Surprise!!!"

मी डोक्यालाच हात लावला म्हणलं, 'आता काय?'
Doctor म्हणाले, "ह्या दाढेला चिकटून अक्कल दाढ़ आहे जी हिरडीतुन बाहेरच आलेली नाहीये. जर फक्त ही दाढ़ काढली तर ती दुखावली जाणार आणि मग तिचा त्रास होणार"

"अरे बापरे..!"
म्हणजे माझ्या खिशाला बाम्बू आणि doctor ला "एक के साथ एक मुफ्त" वाली offer...
परत विचारले की 'दुसरा पर्यायच नाही का?'
Doctor म्हणाले 'नाही... Surgery शिवाय पर्यायच नाही'

Cap लावली असती तर एखाद दुसऱ्या हजाराचे काम, आता दुपटीने वाढले होते..
म्हणलं 'ठीके पण आजच 'तुकडा' पाडा....'
Doctor ने surgeon ची appointment घेतली.
म्हणलं 'ठीके पण आजच 'तुकडा' पाडा....'
Doctor ने surgeon ची appointment घेतली.
त्याच दिवशी उशिरा संध्याकाळी मी माझ्या दाढेचा तुकडा पाडून घ्यायला त्या surgeon पुढे "आ" करून उपस्थित झाले.
प्रस्थापित पद्धतीनुसार आधी Anesthesia दिला, तिनदा...

भयंकर कडवट पाणी तोंडात जमा झालं....
मग माझ्या दंतपंगतींचे उत्खनन चालू झाले, Anesthesia मुळे वेदनेची जाणिव नष्ट झाली होती..
पण जिभेच्या संवेदना, तोंडात जमा होणाऱ्या द्रव्य घटकांच्या चवीची जाणिव देत होत्या....
जिला पडायचे होते, ती माझी दाढ़.. अशी सहजासहजी शरण येईल का?
थोड्या वेळाने त्या surgeon ने माझा जबडा धरला आणि माझ्या दाढेला पूर्ण शक्ति लावून हलवले...

मला, मी कुणीतरी राक्षसी आणि डॉक्टर म्हणजे हनुमान वाटू लागले..
ज्याचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी 'ब्रह्मांडे माईली नेणो, आवळे दंतपंगती' असे आधीच करून ठेवले आहे...

थोड्या वेळाने त्या बिचाऱ्या जखमी दाढेने हार मानली आणि ती धारातीर्थी पडली.
अक्कल दाढेचा निकाल मात्र माझ्यासाठीही गुपितच राहिला..
ह्या सगळ्या प्रक्रियेत मला पु. ल. देशपांडेची फार आठवण येत होती..
त्यांच्या 'मी आणि माझ्या शत्रुपक्षा' मध्ये त्यांनी, dentist ला का सहभागी करून घेतले नसेन ह्याचे मला आश्चर्य वाटले.. कदाचित पु. लं नी त्यांच्या दातांची उत्तम देख रेख केली असणार म्हणून त्यांना डेंटिस्ट शी युद्धच करावे लागले नसेन..

त्या काढलेल्या दाढांना मग टाके घातले गेले. ह्या सगळ्या प्रक्रियेत मी माझ्याच रक्ताच्या औषध मिश्रित चवी घेत होते.
हे सगळं मी सहन करत होते, कारण मला वाटत होतं की आता मला दुखणार नाहीये...
पण म्हणतात ना, 'अज्ञानात सुख असते'.
हे सगळे झाल्यानंतर doctor ने मला समोर बसवून पथ्य सांगितले.

खाण्या-पिण्याचे पथ्य तर होतेच पण दोन दिवस कमी बोलायाचे होते. ( हे ऐकताना मला माहित नव्हते की मला बोलताच येणार नाहीये )
मनात म्हणले बापरे! दाढही माझीच गेली, पैसेही माझेच गेले आणि शिक्षाही मलाच, (म्हणा इतरांना बरे)
पण 'ये तो होना ही था।' कर्म पण तसेच होते माझे.
त्यानंतर साधारण आठवडाभर मला रात्रीची झोप नाही मिळाली. pain killer घेऊन घेऊन भूकही लागत होती आणि खाताही येत नव्हते. पण त्यामुळे अशक्तपणा आला. तशीही सारखीच झोप येत असते पण गोळ्या घेऊन घेऊन सारखीच झोप येत होती, पण लागत मात्र नव्हती. असहय्य वेदना होण्याचा काळ चालु झाला. doctor कडे जाऊन टाके काढून टाकले तेव्हा जरा दुखणे कमी झाले, पण गोळ्या घ्याव्याच लागत होत्या.
दाढ़ काढल्या नंतर दोन आठवडे गोळ्या घेऊन प्रचंड उष्णता वाढवून, सतत कान दुखवत ठेवून दाताच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही हा कानाला खडा आणि मिळालेला धडा !!!!!

Datachya vedana lekhanitun utaralya..chan
ReplyDelete👌
ReplyDeleteAaj mi hya kathela sampurna pane anubhavla aahe... Waah khup chaan ...😉👌 Aaplya lekhnitun Dhir dilyabaddal aaple aabhar Madam 🙏😊
ReplyDelete