शब्द का रुसले आज...
जे होते मनी..
ते उतरलेच नाही पानी...
शब्द धावू लागले इकडे तिकडे...
आणि मी त्या शब्दांच्या मागे..
अर्थ लावत शब्द वेचित फिरत होते...
पण जे उचलले ते शब्द रुचलेच नाहीत...
आणि जे रुचत होते ते शब्द अर्थासाठी धावत होते...
शब्दाचे अर्थ शोधतीये का अर्थाचे शब्द...
काहीच उमगेना...
फिरत होते फक्त शब्द.... शब्द आणि शब्द।।
Shabdancha ha khel sara..
ReplyDelete