शाळेमध्ये दहिहंडी म्हणून आजी आजोबांनी मयंक आणि माधवसाठी कृष्णाचे असे नविन कपडे आणले... आजी-आजोबांना उत्साहच दांडगा...
सोमवारी ही दोघं गेली आजीकडे तर अर्थातच आजीला वाटलं घालून बघुयात नीट बसतायेत का? तर दोन्ही भावांनी त्या कपड्यांना त्यांच्या देहाच्या सावली इतके पण जवळ नाही येऊ दिले.
आजी तरी हरली नाही...
काहीतरी काहीतरी सांगून त्या दोघांना Convince करू लागली, पण दोघांनी नाही म्हणजे नाहीच दाद दिली....
संध्याकाळी आमच्या Society मध्ये आजीने दहिहंडी ठरविली Building मधल्या अजुन काही लोकांनीही त्यांच्या नातवंडांना, मुलांना पाठवले आणि ती दहिहंडी सजली...
संध्याकाळी लोकं Office मधून घरी न जाता तिथेच थांबू लागले...
मयंक आणि माधव खुश होते, दहिहंडी फोड़ायला मिळणार म्हणून... आधी थोडं फेर धरणं आणि नाचणं वगैरे झालं... मग मोठ्यांनी छोटयांना दहिहंडी फोडण्याची शिकवणी देणे चालू केले... पाया भक्कम पाहिजे हा तर दहिहंडीचाही पाया...
पण ही सगळी चिल्ली पिल्ली ना एका वयाची ना एका उंचीची... त्यांनी तयार केलेला पाया तो भक्कम कसा असेन??
कसा बसा मयंक चढला पण त्याला काही स्थिर उभे रहता येईना... त्यात वरून कोणीतरी पाणी टाकले, हा झाला ओला. (बरं... आजपर्यंत आम्ही जी दहीहंडी केली ती म्हणजे कृष्णाचे कपडे घालायचे आणि दहीहंडी फोडायची, मित्रांमध्ये काला वाटायचा आणि कृष्णाची गाणी म्हणायची... त्यात पाणी कधी वापरलं नव्हतं...)
आज हा वर चढला असताना पाणी पडलं जरा दचकलाच, अनपेक्षित होतं त्याला ते आणि नको पण वाटलं... एकीकडे मयंकचे adjust होणे चालू होते तर दुसरीकडे आमचे पेशवे माधवराव, आधी त्याला एकट्यालाच ड्रेस घातला म्हणून चिडला.... आणि चिडून चिडून तो काढून टाकला, मग ते पाणी उडवाउडवी तर कोकणस्थी बीजाला चाललच नाही त्या गर्दीत हा पठ्ठा शिरलाच नाही...
कुठे तरी लांब उभे राहून जिथे अंगावर पाणी नाही पडणार, पाय घाण नाही होणार तिथे ऊभं राहून हा शहाणा Biscuit खात बसला...
हा आमचा Biscuit खाणारा कृष्ण, cricket ची match बघितल्यासारखा दहीहंडीची मजा बघत होता..
बाहेर तोपर्यंत ह्या सगळ्या मोठया मंडळींना लक्षात आलं होत की ही हंडी अशी फुटणार नाहीये...
मग मयंकच्या बाबाने मयंकला खांद्यावर उचलले, मयंकने आजपर्यंत काठीने हंडी फोडली होती, आज ती पहिल्यांदाच नारळाने फोडण्याचे Target होते... नारळ तसा छोटा होता त्याच्या हातात बसेल असा. पण आता ती हलणारी हंडी फोडायची कशी? ह्याने घातला पहिला घाव.. नारळ सुटला हातातून आणि फुटला जमिनीवर जाऊन... नारळाचे दोन तुकड़े झाले... आतलं सगळं पाणी भूमातेला अर्पण...
(नशिब हे सगळं आमच्या कोकणस्थ पेशाव्यांनी नाही पाहिलं नाहीतर तिथेच मला पाणी हवं होत ना म्हणून रडला असता.)
त्या फुटलेल्या नारळाच्या दोन तुकडयांपैकी जो साधारण मोठा तुकडा होता, आणि जो मयंकला हातात धरता येणार होता तो मयंकला परत हातात दिला... हंडी फोडायला मयंकने परत त्या हंडीवर घाव घातला...असे दोन तीन वेळा झाले.
प्रत्येक वेळेला हातातला नारळ खाली पडला आणि सहाव्या सातव्या घावाने अखेर ती हंडी फुटली.. तोपर्यंत माझं लेकरु पाण्याने पुर्ण ओलं झालं होत...
पण कोकणस्थी स्वभाव, कुणाच्याही नकळत हा शहाणा घरात गेला स्वतःला कोरडे करून आणि नविन कपडे घालून बाहेर... काल्याचा प्रसाद देण्यासाठी मदत करायला हजर...
आता बाकीची सर्व मंडळी हंडी फुटल्याचा जल्लोष करत होती... प्रसाद घेण्याची घाई कुणालाच नव्हती. पण आमचा धाकटा कृष्ण.. प्रसादाचा एक द्रोण उचलुन, घरात जाऊन निवांत सोफ्यावर बसून चमच्याने प्रसाद खात बसला. (जग इकडचं तिकडे होऊ देत आपण खात रहायचं आश्या धोरणाने.)
अश्या रितीने घरी केलेली दहीहंडी आनंदात, उत्साहात आणि पाण्यात पार पडली.
आता दुसऱ्या दिवशी शाळेत दही हंडी होणार होती.. त्यासाठी तर नविन कपडे आणले होते...
आजीने सुंदर मुकुट केले तिच्या दोन्ही नातवंडाना. खुपच सुंदर होते ते मुकुट...
दुसऱ्या दिवशी फारसं काम नाही.. दोघांचे आवरायचे आणि शाळेत नेऊन सोडायचे एवढेच.. (निदान असं आदल्या दिवशी झोपताना वाटलं)
दुसऱ्या दिवशी लवकर उठले...
दोघांना खायला आवडीचा शिरा केला...
(मयंक तसा साधा, पण माधवचा मुड भयंकर जपावा लागतो.)
उगाच त्याचा mood नको फिरायला म्हणून त्याच्या आवडीचाच नाश्ता केला.
मयंकला आधी आवरले. छान नवीन कपडे त्याने घालून घेतले. मुकुटही आणि बाजुबंदही. गोडच दिसत होता माझा कृष्ण.
आता माधवला आवरायचे होते. तो कृष्णाचा ड्रेस पाहूनच त्याचं डोकं फिरलं...
शाळेला Uniform घालूनच जायचं, असा हट्ट आमच्या ह्या धाकट्या कृष्णाने चालू केला...
नाही म्हणजे नाहीच घालून घ्यायला तयार शेवटी दादा मदतीला आला... मयंक दादाने समजावून सांगितले मग कुठे तो थोडा Convince झाला. दोघांना भराभरा गाडीत चढवले आणि शाळेत नेऊन पोहचवले... पोचल्यावर, आमचे रुसलेले पेशवे जागेवरून उठायला तयार नाहीत... गणपती बसल्या सारखा बसून राहीला.. तसेच त्याला उचलले तर अंग सोडून दिले ह्या पठ्ठयाने.. त्यामुळे भयंकर जड़ झाले त्याला उचलायला... त्याला बाहेर काढतीये तोपर्यंत त्याची बासरी पडली, तीही गाडी खाली... ती काढायला गेले तर गाडीची किल्ली पडली... माझी उडालेली धांदल बघून मयंक मदतीला आला... तर त्याचे मुकुटाचे दोन मणी पडले म्हणून त्याची राडारडी, मला अजुनच सुधरेना शांतपणे त्याला म्हणलं आधी शाळेत पोहचू...
माधवला उचलून कडेवर घेतले...
एका हातात दोघांच्या बॅगा, कडेवर माधव...
दुसऱ्या हाताला मयंक...
ते दोघे कृष्णावतारात आणि मला घडलेले विश्वरुपदर्शन...
शाळेच्या दारात Teacher कडे माधवला दिले. बाकीची मुले देखील कृष्ण बनून आले आहेत हे बघितल्यावर त्याचा Uniform न घातल्याचा रुसवा गेला..
एवढं Uniform चं वेड आहे तर Army मध्ये जाशील का असं आलं माझ्या मनात...
पण अडीच वर्षाच्या लेकरासाठी ते स्वप्न आकलनापलिकडचच..
आता मयांकचा मुकूट दुरुस्त करायचा होता.. fevicol बरोबरच होता... ते पडलेले मणी त्याने जपून ठेवले होतेच.. त्याच्या मुकुटाला ते चिकटवले.. आणि मयंकच्या चेहऱ्यावर जो काही आनंद पसरला तो अवर्णनीय होता.. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा म्हणजे आनंदी राहणच अंगवळणी पडतं हे लहान मुलांकडूनच शिकता येते..
ते दोघे आनंदाने शाळेत गेले, हुश्श झालं....
मी गाडीत येऊन बसले..
घोटभर पाणी प्यायला आणि radio लावला, तर गाणं होतं, "हे जीवन किती सुंदर आहे"!!!!!!!!!!

मस्तच
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteKharach hi lahan mula khup mothya goshti shikat astat !ani photo tak na tyanche krushnachya rupatle ajun Chan vatel
ReplyDeleteSagali dahihandi punha ekda dolyansamor ubhi rahili...ani tevha miss zalelya "madhavlila" vachunhi maja ali..mast lihilays
ReplyDelete