"ती" ने office मध्ये प्रवेश केला.. ती ला असं वाटत होतं की रोजच्या सारखाच दिवस आहे..
पण सगळं office ती कडे बघत गालातल्या गालात हसत होतं..
ती ला कल्पना होतीच की का हसत आहेत ह्याची..
पण शक्य तितके ती, ते न दाखवण्याचा प्रयत्न करत होती.. आणि आपल्याला झालेली जखम लपवण्याचा असफल प्रयत्न ही करत होती..
सहसा जखम म्हणल्यावर लोकांनी सहानभूती दाखवणे अपेक्षित असते.. पण सहानभूती ही कदाचित जखम कुठे आहे त्यावरून ठरते...
बरोबर ओठांच्या कडा काळ्या निळ्या झाल्या होत्या 'ती'च्या.. (जखमांना वेदना असतातच.. पण काही वेदना पण गुलाबीच असतात, मग ती जखम कुठे आहे आणि कशी झाली ह्याला फारसा अर्थ रहात नाही)..
आता या जखमेने आणि त्या जखमेच्या संदर्भात येणाऱ्या प्रश्नांनी ती अवघडली जाणारच होती.. त्यात लोकांचं तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसणं ती ला अजूनच अवघडवून टाकत होतं..
पण शक्य तितका प्रयत्न करत ती काहीच झालं नाही असं दाखवत होती..
नवीन लग्न आहे म्हणून लोकांनी दुर्लक्ष करावं तर तसही नाही.. लग्नाला चांगली पंधरा वर्षे झालेली.. त्यात ती चा स्वभाव मुळातच गुलाबी..
दुसऱ्या कुणाला अशा अवघड ठिकाणी जखम झाली असती तर ती ने दिवसभर त्या व्यक्तीला सळो की पळो करून सोडलं असतं..
पण आता तर ती स्वतःच शिकार झाली होती..
परत चर्चेला उत आला..
"अजूनही romance टिकून आहे"..
"ती तर चिरतरुणच आहे"..
"वेळ कसा मिळतो ना?"..
(काही लिहिण्यासारख्या तर काही न लिहिण्यासारख्या चर्चा)..
ती पुरती गोंधळून गेली होती..
ओशाळूयात, लाजूयात का अवघडून जाऊयात हे तिला समजेना..
सगळ्यांना ती सारखी सारखी सांगत होती, "अरे लेकीशी खेळताना लागलं रे!!"
पण कुणी काय ऐकून घेणार..
झालेली जखम आणि जिथे झाली ती जागा हे लोकांना पुरे होतं ती ची चेष्टा करायला..
त्यात ती ने दुपारच्या जेवणात बीट आणलं होतं.. कुणी म्हणलं, 'जखम आता गुलाबी होणार'..
कुणी म्हणलं, 'जखमेला मीठ नको लागू देऊ बाई'..
तर कुणी म्हणलं, 'घरी जाऊन लेकीचे काही खरे नाही आता'...
या सगळ्या टोमण्यांना, सामोरे जाताना, "ती" च्या मनात 'खरचच काही केलं असतं तर बरं झालं असतं' असं येऊनही गेलं असेल..
सहजच होणाऱ्या काही जखमापण कधी कधी चमत्कारिक खुणा ठेऊन जातात आणि ही जखम तर अगदीच गुलाबी म्हणायची.. मग तिला थोडे बोचणारे प्रतिसाद आले तर काय नवल त्यात...
Gandhali khoop chan.
ReplyDeleteYou always write articles very briefly but convey your views perfectly in a right direction...😃
Thank you so much madam
Delete