Monday, 14 January 2019

Oh My God!!!!!!!

"चला, आवरा... उठा... जेवायची वेळ झाली"
हा आवाज घरात आईचा नसून, खाबूगिरीचे प्रमुख खवय्ये टूबुकदादांचा, खाबूगिरीच्या wats app group वर, ते स्वतः सुट्टीवर असताना पडलेला msg असतो..
दररोज बरोबर दुपारचे एक वाजले, की ऑफिस मधले light बंद होतात आणि स्वतःच्या घरातल्या एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रण द्यावे तसे टुबुक दादा प्रत्येकाच्या टेबलाजवळ जाऊन जाऊन त्यांना, स्वतःचाच (म्हणजे ज्याचा त्याने) डबा खायला ते बोलवत असतात.. जणू काही सगळ्यांनी वेळेत जेवण करणे ही त्यांचीच गरज आहे.. मग स्वतःच लवकर पुढे जाऊन 16 ते 17 लोकांना एकत्र बसता यावं म्हणून टेबलं जोडणार.. जणू काही सगळ्यांनी एकत्र बसावं ही देखील त्यांचीच गरज.. पण त्यांचा तसा आग्रह असल्यामुळेच खाबूगिरी ला  एकत्र जेवता येते.. आणि जेवणाबरोबर गप्पा पण पोटभर होतात.. आणि यदा कदाचित ते सुट्टीवर असले तर msg करून ते आठवण करतातच..
स्वतः खाण्यावर आणि मित्रांवर अत्यंत जास्त प्रेम करत असल्यामुळे सगळ्यांनी वेळेत जेवावे असा आणि एकत्र जेवावे असा सतत आग्रह ते करणार.. सगळ्यांच्या आवडी निवडी माहिती असलेले आणि जर कुणाला जेवायला यायला उशीर होणार असेल तर त्या व्यक्तीला, ती व्यक्ती जेवायला येई पर्यंत 'लवकर ये' म्हणून फोन करणारे..
नुसते जेवणच नाही तर चहासाठी सुद्धा प्रत्येकाच्या टेबलपाशी जाऊन जातीने बोलावणार.. (जसं काही स्वतःच्या हातानेच तो बनवलाय..)
कुणालाही कधीही कोणत्याही प्रकारची माहिती वा मदत कोणत्याही वेळी ते उपलब्ध करून देतात.. एकच माहिती एकाच माणसाला अनेक वेळा आणि सतत देण्याचा चमत्कारिक संयम त्यांच्या जवळ आहे.. त्यामुळेच office मधल्या प्रत्येकच माणसाला ते मित्र वाटतात, ते ही अगदी जवळचे..
टुबुक दादांच्या ऑफिसच्या drawer ला जसा खाऊ असतो तसेच औषधे पण असतात.. कोणत्याही दुखण्यावरचे औषध असो वा खूप पोट भरल्यानंतर बडीशेप हवी असो, टुबुक दादांच्या drawer ला सगळे पर्याय उपलब्ध असतात.. आणि ही औषधे आणि बडीशेप regularly refill देखील ते स्वतःच (बऱ्याचदा स्वखर्चाने) करतात.. आणि संपूर्ण office मध्ये कुणाला कशाचीही मदत हवी असल्यास, टुबुक दादा तत्परतेने स्वतः मदतीला उपलब्ध असतात..
प्रत्येकाच्या आवडी निवडी लक्षात ठेवून प्रत्येकाला आवडेल असा खाऊ ते आणत... friendship day ला न विसरता सगळ्यांना cadboury आणि दिवाळीत आठवणीने स्वतः बनवलेली चकली...  थोडक्यात काय तर सगळ्यांचेच अत्यंत लाड करणार..
मुळचे दुष्काळी भागातले असल्याने पाणी आणि निसर्गाची विशेष कदर ते करणार.. ते स्वतः अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रे टिपतात... निसर्गाची photography तर त्यांचा हातखंडा.. निसर्गातल्या सूक्ष्म आणि अति सूक्ष्म घटकाला, मग तो पाला पाचोळा असो, वा फूल किडे मुंग्या फुलपाखरू, सगळं त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होतं..आणि  टुबुक दादा फोटोग्राफी करत असल्याचा फायदा खाबूगिरी मधल्या सुंदर्यांना पुष्कळदा होतो.. बिचारे टुबुक दादा देखील अत्यंत संयमाने छायाचित्र टिपत असतात..
अमृतांजन roll on शिवाय कुठलेच व्यसन नाही आणि (स्वतःच्या) फोन शिवाय कश्याच्याच ते आहारी गेलेले नाहीत..
फारसं कधी कुणाला कश्यासाठी नाही ते म्हणत नसत, कितीही कुणी व्यक्ती नावडती असो, पण टुबुक दादा सगळ्यांशीच प्रेमाने आणि काळजीने वागणार.. (अतिशय जास्त) चांगुलपणाचं  जीवंत उदाहरण म्हणजे टुबुक दादा..असे हे जगमित्र टुबुक दादा.. एकत्र जगण्याचा आनंद घेणारे आणि तसं जगायला त्यांच्या आप्तांना भाग पडणारे...

2 comments:

  1. Brillent. Tubuk dada dolya samor ale..

    ReplyDelete
  2. Mast👌🏻👌🏻 kadhi kadhi tar hya Tubuk dada mule aapan jevayache ani velet ghari jayache aahe he kalate. Karan sagalyana ghari jayachi aathavan pan hech kartat.

    ReplyDelete