Saturday, 2 February 2019

बाकी शून्य!!

"बास आता हेच final करूयात"
असं वाक्य निदान चार हजार वेळा तरी खाबूगिरीच्या कट्ट्यावर बोलले जाते.. विषय बऱ्याचदा वेगवेगळा असतो.. पण या वेळेला तो सगळ्यांनी common कपडे घेण्याचा होता.. हा common कपडे घेण्याचा विषय साधारण वर्ष दीड वर्षांपासून निघाला असेल.. खाबूगिरीच्या कट्ट्यावर इतका प्रचंड चघळलेला दुसरा कोणताच विषय नसणार..
Facebook, wats app जिथे कुठे कुणी कपड्यांची विक्री करत असतील त्या सगळ्यांपाशी विविध प्रकारच्या कपड्यांच्या खरेदीची विचारपूस करण्याचे सत्र चालू झाले..
एखाद वेळी कुणी नवीन ड्रेस घालून आलं आणि तो ड्रेस एकीला कुणाला तरी आवडला तरी लगेच आपण तसाच ड्रेस common घेऊ, असा प्रस्ताव त्वरित प्रस्तुत होणार.. मग त्यातून चर्चा रंगणार..  रंग, कापड, variety, quality या सगळ्याचीच चर्चा.. मग त्या चर्चेतून अजून चर्चा.. चर्चांना अजून वाटा.. प्रत्येक वाटेला वेग वेगळ्या चर्चा.. चर्चांचे निष्कर्षही चर्चा आणि आरंभ अंतही चर्चाच.. निरेची हजारदा ताडी होईल पण खाबूगिरीच्या चर्चा काही संपणार नाहीत..
अश्याच चर्चां मधून अनेक मुद्दे निघतात..(आणि परत ह्या अनेक मुद्द्यांच्या अनेक चर्चा होतात..) ह्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे आपण मुलांना (म्हणजे पुरुषांना) पण वापरता येईल असे काहीतरी common घेऊ.. मुद्दा बरोबर होता.. त्यामुळे त्यावर चर्चा होणं रास्तच होतं.. चर्चेचा निष्कर्ष असा निघाला की आपण common sweatshirt घेऊयात.. मग तशी कृती झाली, चौकश्या झाल्या.. काही sample मागवले गेले आणि निर्णय होता होता ते सगळे बारगळले.. मग ते कसे बारगळले ह्याची  काही दिवस चर्चा..
त्यानंतर अनेक दिवस wats app वर येणाऱ्या प्रत्येक ड्रेस, साडी, कुर्त्याच्या जाहिराती मनावर घेतल्या जाऊ लागल्या.. प्रत्येकच वेळेला "बास आता हेच final करू" असं म्हणून नवीन काही आले की "बघू बघू" असं म्हणत परत चर्चेला उधाण येई.. आणि चर्चेतच त्याचा अंत होई..
असेच एकदा नवीन आलेल्या madam ने online विकत घेतलेली साडी नेसली होती, ती साडी सगळ्यांनाच आवडली, म्हणून तशाच साड्या online मागवायच्या ठरवल्या.. पण online साड्या बघितल्यावर, त्या madam ने घातले होते तसे blouse available नसल्याने ते पण रद्द झाले..
नवरात्रात नऊ रंग घालतात, तेव्हा तरी हे common घेतलेल्यामधले घालूयात असा विचार झाला आणि परत नवरात्री आधी दोन आठवडे शोध मोहीम अजून जोरात चालू झाली.. आता चक्क काही सख्या मिळून दुकानात जाऊन काही कपडे बघून आल्या.. पण महाग वाटल्याने परत गाडी online खरेदी कडे वळली.. आणि online dress material चे selection करण्याची प्रक्रिया चालू झाली.. प्रत्येकाने आपल्या आवडीचा रंग select केला.. आणि आता फक्त order करायची ठेवली होती.. दुसऱ्या दिवशी office मध्ये येऊन order पण केली.. साधारण तेरा हजार रुपये असे Bill झाले.. cash on delivery.. एकत्र करता नाही आली म्हणून वेगवेगळी order place केली.. आणि काही दिवसातच ती order आली.. उत्साहात सगळ्यांनी पैसे जमा केले.. आणि आनंदात ती order आणली.. अर्थातच ते कपडे कसे आहेत हे बघण्याची उत्सुकता फारच दांडगी होती.. त्यामुळे भराभर सगळ्यांनी आपापले parcel उघडून पाहिले.. आणि दोघी सोडल्या तर बाकी सगळ्यांचेच मत, "फोटो मध्ये तर वेगळेच दिसत आहे" असे झाले.. त्यामुळे ते parcel आल्या पावली परत गेले.. आता जेवायच्या वेळेत परत चर्चांना उधाण आले.. की आता आपण online घ्यायलाच नकोच.. मग काय करायला हवे आणि कसे करायला हवे ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी मतं.. चौदा स्त्रीयांच्या चौदाशे आवडी निवडी.. एका कोणत्या वस्तूवर एकमत कसं काय होईल बरं!! Order केली, ती आली आणि परतही गेली.. बाकी राहिले शून्य आणि त्या शून्याच्याही न संपणाऱ्या अनंत  चर्चा.............

No comments:

Post a Comment