Tuesday, 8 April 2025

थांबायचं का थोडं?

Actually ट्रॅफिक जॅम हा प्रॉब्लेम नाहिये, कुणाला थांबायचेच नाही हा प्रॉब्लेम आहे.
सतत मनाला कसलीतरी हुरहुर आणि त्या हुरहुरी पोटी विनाकारण अस्वस्थता, हाच आपला स्वभाव बनला आहे. त्यामुळे कुठेही आणि कश्यासाठी ही थांबावे लागले की मन व्याकुळ होते. आणि त्याचे रूपांतर चिडचिडीत करते.
हाताबाहेर असलेल्या परिस्थिती वर किती चिडणार आणि त्यामुळे किती वेळा त्रागा करणार!
त्या पेक्षा थोडे थांबलो तर! सगळ्या चिडचिडीला अस्वस्थतेला वाहून जायला वाट मोकळी करून दिले तर?
अगदी लागेच शांत नाही वाटलं तरी मोकळा मोकळं नक्कीच वाटेल!
मग? थोडं थांबायचं का?